आत्मविश्वासाचा भ्रम - ‘डनिंग क्रुगर इफेक्ट’

  •    01 Sep 2023

आत्मविश्वास जेवढा आवश्यक आहे तेवढाच फाजील आत्मविश्वास मात्र घातक ठरू शकतो. वादविवादात वडीलधारी मंडळी लहानांना एक वाक्य नेहमी ऐकवतात,  “तू स्वतःला फार शहाणा समजू नकोस!” 

हे वाक्य सतत ऐकून गुळगुळीत झालेले आहे त्यामुळे मी खरंच स्वतःला शहाणा समजतो का? यावर फारसा विचार केला जात नाही. मला एखादी गोष्ट ‘जशी आहे तशी’ समजली आहे की त्या गोष्टीची मला आवडते ती व्हर्जन मी डोक्यात घेतली आहे?, प्रश्नाचा सर्व बाजुंनी मी विचार केला आहे का?, विरोधात जाणारी मते गांभीर्याने मी अभ्यासली आहेत का? असे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारात नसाल तर तुम्हाला “आत्मविश्वासाचा भ्रम” नाही ना हे तपासायला हवे. 


  • The greatest enemy of knowledge is not ignorance, it is the illusion of knowledge.- Daniel J. Boorstin


  • The problem with the world is that the intelligent people are full of doubts, while the stupid ones are full of confidence.- Charles Bukowski


  • Ignorance more frequently begets confidence than does knowledge. - Charles Darwin



१९ एप्रिल १९९५ रोजी एक मध्यमवयीन धट्टाकट्टा मनुष्य अमेरिकेतील पिट्सबर्ग येथे बँकेत दरोडा टाकायला गेला. हातातल्या बंदुकीच्या जोरावर त्याने २ बँका लुटल्या. नेहमीच्या दरोडेखोरांमाणे त्याने बुरखा घालून किंवा मास्क लावून स्वतःचा चेहरा लपवण्याचा अजिबात प्रयत्न केला नव्हता. सुरक्षा कॅमेर्‍यापुढे त्याने एक स्मितहास्य सुद्धा मुद्दाम दिले होते. पोलिसांनी त्यांचे काम चोख बजावत त्याच मध्यरात्री मॅकआर्थर व्हीलर यास दरोड्याच्या आरोपावरुन ताब्यात घेतले. आपल्याला पोलीस अजिबात पकडू शकत नाहीत असा मॅकआर्थरचा गाढ वास

होता. पोलसांना तो म्हणाला, “पण मी तर लिंबाचा रस चेहर्‍याला लावला होता..” 


लिंबाच्या रसाने कागदावर लिहिले असता जोपर्यंत कागदाला उष्णता मिळत नाही तोपर्यंत ते वाचता येत नाही. आपण चेहर्‍याला लिंबाचा रस लावला असता कुणालाही आपण दिसू शकणार नाही याची मॅकआर्थर व्हीलरला पक्की खात्री होती. तो ठार वेडा आहे किंवा त्याने नशा केली आहे, असे तुम्हाला वाटेल. पण तसे नव्हते. पोलसांनी त्याची अमली पदार्थ सेवन केल्याची आणि मनःस्थतीची चाचणी केली असता तीसुद्धा सामान्य आली होती. 


या बिनडोक दरोड्याच्या घटनेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. कॉर्नेल विद्यापीठात मानसशास्त्र शिकवणार्‍या प्राध्यापक डेव्हिड डनिंग यांना या बातमीत एका मूर्ख माणसाच्या दरोड्यापेक्षा काहीतरी वेगळे सापडले - एखाद्या विषयाची फार कमी माहिती असलेल्यांना त्या विषयात आपण प्रावीण्य मिळवले आहे असे वाटणे !


त्यांनी १९९९ मध्ये तसा शोधनिबंध प्रकाशित केला. पुढे तो शोधनिबंध ‘डनिंग क्रुगर इफेक्ट‘ म्हणून सिद्ध झाला.


  • प्राध्यापक डनिंग यांनी विद्यार्थी जस्टिन क्रुगरला सोबत घेऊन अनेक मानसशास्त्रीय प्रयोग केले. व्याकरण, विनोद, तर्कशास्त्र या विषयांवर विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारण्यात आले.

  • तुम्ही किती गुण मिळवाल याचा विद्यार्थ्यांना अंदाज बांधायला सांगितला असता ज्यांना सर्वात कमी गुण मिळाले त्यांना ते सर्वात जास्त गुण प्राप्त करतील असे वाटत होते. या उलट ज्यांना खरोखरच उत्कृष्ट गुण मिळाले त्यांना मात्र तसा आत्मविश्वास नव्हता.


दैनंदिन जीवनातली काही उदाहरणे पुढीलमाणे आहेत - 

  • खराब गाडी चालवणारे स्वतःला उत्कृष्ट चालक समजल्याने बरेच अपघात होतात.

  • विविध रिएलिटी शोज मध्ये अनेक उमेदवार कौशल्ये नसल्याने स्पर्धेतून बाहेर फेकले जातात. आपल्याला काहीच येत नाही म्हणून आपल्याला बाहेर काढले गेले आहे यावर त्यांचा अजिबात विश्वास नसतो. बर्‍याचदा आपल्याला हे टीव्हीवर बघताना करमणुकीचे वाटते. असे स्पर्धक मात्र स्वतःच्या पात्रतेविषयी खूप गंभीर असतात. 


सर्वसाधारणपणे आपण प्रत्येक जण कुठल्यातरी क्षेत्रात आपल्या क्षमतांना अवास्तव महत्व देत असतो. त्यामुळे दोन प्रकारच्या अडचणी निर्माण होतात.

१. अपुर्‍या अभ्यासाच्या जोरावर, स्वतःच्या अज्ञानामुळे चुकीचे निर्णय घेणे.

२. आपण चुकतोय हेच न समजणे कारण बरोबर काय असेल याची आपल्याला माहिती नसते.

  • अभ्यास वाढून अज्ञानाची जाणीव व्हायला लागली की अनुभवामुळे आपल्या चुका लक्षात येऊन सुधारणा होतात. स्वतःला आहे त्यापेक्षा जास्त शहाणे समजायची ही मानवी वृत्ती  ‘डनिंग क्रुगर इफेक्ट‘ हे नाव मिळण्याआधी खूप पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे.

  • बरेचदा ज्ञानापेक्षा अज्ञानच आत्मविश्वास निर्माण करते व “खरे ज्ञान म्हणजे आपले अज्ञान जाणून घेणे!” असे विविध प्राचीन ग्रंथांमध्ये ज्ञानी लोकांनी लिहून ठेवले आहे.

  • नवतरुणांना प्रौढ लोकांपेक्षा ‘ग ची बाधा’ होण्याचे प्रमाण जास्त असते कारण विविध वयात बरे-वाईट अनुभव घेतलेला व्यक्ती आत्मविश्वास आणि फाजील आत्मविश्वास यातील फरक ओळखून असतात. 


आर्थिक ज्ञानाचा भ्रम - ‘डनिंग क्रुगर इफेक्ट’ आर्थिक जीवनात कसा परिणाम करतो ते आपण बघूया - 




आपली अपेक्षा /

आत्मविश्वासाचा भ्रम


वास्तव स्थिती

तुम्ही काय

करायला हवे?


पगारा

बाबत


मी ज्या क्षेत्रात काम

करतो आहे, त्यात

पुढे ‘अच्छे दिन’

येणार आहेत. माझ्या

कंपनीबरोबरच माझी

आपोआप प्रगती

होईल आणि 

पगारवाढ मिळेल.

म्हणून कुठलाही खर्च 

करण्यास मी मागेपुढे

बघत नाही.


एखाद्या क्षेत्रात जास्त

फायदा मिळायला

सुरुवात झाली की 

अनेक लोक त्या

क्षेत्रात नव्याने दाखल

होतात. स्पर्धा वाढते.

कालांतराने नफा

कमी होतो. निरंतर 

स्वतःला अपडेट 

करणार्‍या कंपन्या

आणि कर्मचारी टिकतात. चांगले

निकाल दिल्यावरच

पगारवाढ होते.

उत्पन्न कितीही

असो, बचतीची

सवय सुरुवातीलाच

लावावी. प्रत्यक्ष

हातात पैसे

आल्याशिवाय ते कसे

खर्च करायचे याची

दिवास्वप्ने टाळावीत.


निवृत्ती 

नियोजन करुन

निवृत्तिनिधी साठवायची गरज मला नाही. माझी अपत्ये पुढे नक्कीच  माझी

काळजी घेतील.


वाढती महागाई आणि 

वयानुसार वाढणार्‍या

खर्चाची तरतूद प्रत्येकाने उत्पन्न सुरु असतानाच करायला हवी.

तुमची अपत्ये तुमची

म्हातारपणाची काठी 

जरुर असतील; पण

त्यांच्यावरील आर्थिक 

बोजा होणे टाळा.

पुढच्या पिढयांना 

तुमच्यापेक्षा जास्त

स्पर्धेला तोंड द्यावे

लागणार आहे.

आत्मनिर्भर,

स्वाभिमानी

निवृत्तिसाठी 

आधीपासूनच

प्रयत्नपूर्वक 

निवृत्तिनिधी उभा

करा.


कर्ज 


माझे उत्पन्न वाढतच

राहणार आहे म्हणून

मी घर, गाडी,

घरातल्या वस्तू, फर्निचर, परदेशी

सहली या

सगळ्यांसाठी नेहमी

कर्ज काढतो. कर्ज 

घेणारा माणूस श्रीमंतच असतो.


उत्पन्न वाढेलच याची

खात्री कधीही नसते.

पण कर्जाचे हप्ते

नक्की फेडावे

लागतात. कर्जावरील व्याज भरणे म्हणजे

तुम्ही न परवडणार्‍या

गोष्टी वेळेआधी

खरेदी केल्याने त्यांचे

एक प्रकारे भरलेलं

भाडं असतं.


कर्ज घेताना सर्व 

बाजूंनी विचार 

करावा. उत्पन्नात

चढउतार आले तरी

माझ्या कर्ज 

परतफेडीवर

कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही

याची काळजी घ्यावी.


शेअर

मार्केट 


युट्युबवर मी असा

व्हिडीओ बघितला की  माझ्यापेक्षा कमी

शिकलेल्या एका

माणसाने इंट्राडे ट्रेडिंग करुन कमी

काळात भरपूर छपाई

केली आहे.

मी तर खूप हुशार

आहे. माझी नोकरी/

व्यवसाय सांभाळत,

रोजचे रोज ट्रेडिंग 

करुन मला वॉरेन

बफे बनण्यापासून

कुणीही रोखू

शकणार नाही.


वॉरेन बफे गेली ८

दशके शेअर मार्केटचे विद्यार्थी असून ते

दीर्घकाळात शेअर

मार्केटचा तपस्व्यासारख्या 

अभ्यास करत

आहेत. इंट्राडे ट्रेडिंग 

करुन सातत्याने

उत्पन्न मिळवणारी

उदाहरणे तुरळक

आहेत.


शेअर

मार्केट मधील

गुंतवणूक

करण्याआधी तुमची

आर्थिक परिस्थिती 

तपासा. पुरेसा

आणीबाणी निधी,

विमा असल्यावरच

शेअर मार्केटचा अभ्यास करायला

सुरुवात करा.

अभ्यासाशिवाय

शेअर मार्केटमधली

गुंतवणूक एक होऊ

घातलेला आर्थिक 

अपघात असतो.

काहीशे रुपयांच्या

अनिश्चित नफ्यासाठी 

तुमची चांगली नोकरी

किंवा व्यवसाय 

पणाला लावू नका.



आर्थिक निर्णय घेतांना सदैव जागरूक असणे महत्वाचे आहे. चेकलिस्टचा वापर, तज्ञांचा सल्ला, पूर्वी घेतलेल्या आर्थिक निर्णयांचे पुनरावलोकन, मोठ्या निर्णयांत सेकंड ओपिनियन घ्यायची सवय तुम्हाला अतिआत्मविश्वासाच्या भ्रमात जाण्यापासून वाचवते. 

एखादा माणूस मात्र सतत अतिआत्मविश्वासाच्या भ्रमात जगत असेल तर पुढील वाक्य आठवा आणि या व्यक्तीकडे दुर्लक्ष करा !  “If you are very very stupid, how can you realize that you are very very stupid? You have to be relatively intelligent to realize how stupid you are.”  John Cleese 




  • सीए अभिजीत कोळपकर - “अर्थसाक्षर व्हा!” या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक आहेत.